Parner Crime : कीर्तनकाराचा मुलीवर अत्याचार; पारनेर तालुक्यातील प्रकार, आरोपीस पोलिस कोठडी

एका कीर्तनकाराने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार वर्षे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पारनेर तालुक्यात घडला.
Crime
Crimesakal
Updated on

पारनेर - एका कीर्तनकाराने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार वर्षे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पारनेर तालुक्यात घडला आहे. यशवंत एकनाथ थोरात ऊर्फ अण्णासाहेब गुंजाळ असे या आरोपीचे नाव आहे. त्याने पीडित मुलीला गरम लोखंडी पक्कडीने चटके देऊन अमानुष मारहाण केली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी या कीर्तनकाराला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com