
श्रीगोंदे : भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने जोराची धडक दिल्याने बाजीराव लक्ष्मण दांडेकर (वय ७५, रा. दांडेकर मळा, श्रीगोंदे) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (ता.१७) दुपारी साडेचारच्या सुमारास श्रीगोंदे-आढळगाव रस्त्यावर घायपतवाडी शिवारात घडला.