
श्रीगोंदे : उन्हाळ्याच्या सुट्या लागणार असताना तालुक्यातील शाळांना मार्च महिन्यात जवळपास तीन महिन्यांचा पोषण आहार पाठविण्यात आला. ही पद्धती संशयास्पद असून याबाबत सविस्तर माहिती संकलित करून या पोषण आहार पुरवठ्यातील त्रुटी दूर करण्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा करणार आहोत, अशी माहिती आमदार विक्रम पाचपुते यांनी दिली. आमदार पाचपुते यांनी सोमवारी (ता.१६) दुपारी तालुक्यातील हिरडगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट दिली. यावेळी त्यांनी पोषण आहाराची पाहणी केली असता त्यात काही कालबाह्य मसाले आढळून आले.