
अहिल्यानगर : पूर्ववैमनस्यातून तरुणाला ठार मारल्याची घटना नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे रविवारी (ता.२२) घडली. बळीराम देविदास शिंदे (वय २८, रा. गुंडेगाव, ता. नगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. खून करून पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी सुप्याजवळ पाठलाग करून पकडलेे.