esakal | जोठेवाडीच्या धबधब्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रीकरण व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

The shooting of Jotewadi Falls has gone viral on social media

दोनशे फुटांवरून फेसाळत खाली पडणारा जलप्रपात.. त्यातूनच आजूबाजूला उडणारे पाण्याचे तुषार.. 

जोठेवाडीच्या धबधब्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रीकरण व्हायरल

sakal_logo
By
शांताराम जाधव

बोटा (अहमदनगर) : दोनशे फुटांवरून फेसाळत खाली पडणारा जलप्रपात.. त्यातूनच आजूबाजूला उडणारे पाण्याचे तुषार.. गुडघाभर खोलीच्या पाण्यात फेसाळणारे जलकण मनसोक्त अंगावर घेणारे आबालवृद्ध... आजूबाजूला हिरवेगार डोंगर... हे सर्व वर्णन आहे आजपर्यंत दुर्लक्षित संगमनेर तालुक्‍यातील जोठेवाडी येथील धबधब्याचे. सद्यः स्थितीत हा धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. 

जेमतेम महिन्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या धबधब्याचे चित्रीकरण व्हायरल केले आणि मग आंबी खालसा गावातील जोठेवाडीच्या कसबे वस्तीपासून पाचशे मीटरवर असलेला हा धबधबा पाहण्यासाठी तरुणाईची पावले वळू लागली. 

पर्यटन स्थळी जाण्यासाठी झाडाझुडपांतील वाटेचा, लहान-सहान ओहोळांच्या पाण्याचा व मऊ चिखल वाटेचा आनंद पर्यटक घेत आहेत. गेल्या महिनाभरात शनिवार व रविवारी संगमनेर, पारनेर, अकोले तालुक्‍यांसह नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई येथूनही शेकडो पर्यटकांची पावले या दुर्लक्षित धबधब्याकडे वळत आहेत. अनलॉक-4 सूचनांनुसार आम्ही पर्यटकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करीत आहोत, असे सरपंच सुरेश कान्होरे व तुकाराम कसबे यांनी सांगितले. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image