Video : कर्जत यात्रेला येतो विठू सावळा... पहा सोहळा, याचि देही याचि डोळा

Short film on Karjat Rathyatra
Short film on Karjat Rathyatra

कर्जत: श्री संत गोदडमहाराज यांना संत परंपरेत महत्त्वाचे स्थान आहे. कामिका एकादशीला त्यांची रथयात्रा भरत असते. या यात्रेला पंढरीचा पांडुरंगच येत असतो, अशा भाविकांची श्रद्धा आहे. परंतु यंदा कोरोना महामारीने पंढरीची वारी बंद पाडली. मोजक्याच पालख्या एसटीने नेण्यात आल्या.

कर्जत येथील गोदडमहाराज यात्रेलाही कोरोना आडवा आला आहे. त्यामुळे यात्रा भरणार नाही. या यात्रेला अवघा कर्जत तालुकाच नव्हे तर जामखेड, करमाळा, श्रीगोंद्यातीलही भाविक येतात. ही यात्रा भक्तीसोबत, व्यावसायिकांच्या दृष्टीनेही महत्त्वाची असते. परंतु कोरोना सर्वांवरच पाणी फेरले आहे. त्यामुळे यंदा अनोख्या पद्धतीने रथोत्सव होणार आहे. मात्र, त्यासाठी घरीच बसावे लागेल. घरी बसून हा सोहळा अनुभवता येईल.

श्री संत सद्गुरू गोदड महाराज रथोत्सवावर लघुपट करण्यात आला आहे. त्याच्या पोस्टरचे अनावरण ध्यान मंदिर  येथे सामाजिक अंतर ठेवून पार पडले.

कोरोनासारख्या जागतिक महामारीमुळे दीडशे वर्षाची श्री संत सद्गुरू गोदड महाराज आणि रथोत्सवाची परंपरा खंडित झाली. रथोत्सवाच्या आठवणी जाग्या व्हाव्यात म्हणून प्रगती नर्सरी प्रस्तुत रथोत्सव व्हिडिओग्राफी टीम व प्रोमोमॅक्स ऍडव्हटायजिंग निर्मित आठवणीतला रथोत्सव हा लघुपट तयार केला अाहे. 

या लघुपटाच्या पोस्टरचे अनावरण आज येथील पाटील गल्ली  ध्यान मंदिर  येथे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, मुख्याधिकारी गोविंद जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले  , पंढरीनाथ काकडे, उद्योजक महेश तनपुरे, नगरसेवक सचिन घुले, उद्योजक  ओंकार तोटे, भास्कर भैलुमे, युवराज  लाळगे  यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी मुख्याधिकारी गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी केलेल्या कामाची प्रशंसा करत रथोत्सव काळात 15, 16 व 17 जुलै रोजी जनता कर्फ्यु चे पालन करून घरी राहून लघुपट पाहण्याचे आवाहन केले. प्रशासनास सहकार्य करण्यास सांगितले. 
प्रवीण घुले यांनी सर्व फोटोग्राफी टीमने केलेल्या कामाचे कौतुक करत धन्यवाद दिले. यावेळी प्रगती नर्सरीचे संस्थापक  शरद तनपुरे, विनायक ढवळे,  अस्लम पठाण,  अण्णा बागल, भरत तुपे, योगेश गांगर्डे, विशाल ढवळे, सागर डाळिंबे, सुमित भैलुमे, अर्षद शेख, मंगेश ढवळे, गणेश शिंदे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com