
संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला, तसेच राज्यघटनेच्या मार्गदर्शिकेचे वाचन करण्यात आले.
कोपरगाव (अहमदनगर) : शासनाकडून जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न श्रमिकराज कामगार संघटनेतर्फे करण्यात येणार आहे. यामध्ये कामगारांनी नावे नोंदवावीत, असे आवाहन माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केले.
संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला, तसेच राज्यघटनेच्या मार्गदर्शिकेचे वाचन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विश्वकर्मा समाजाचे प्रदेशाध्यक्ष संजय सूर्यवंशी होते. माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील म्हणाले, श्रमिकराज कामगार संघटनेतर्फे इमारत बांधकाम कामगारांसाठी सभासद नोंदणी मोहीम सुरू करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असून, तो गौरवास्पद आहे.
बुद्ध धम्म प्रसारक मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष भिक्खू आनंद सुमन सिरी, भिक्खू कश्यप, रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र सचिव दीपक गायकवाड, ऍड. नितीन पोळ, ऍड. सुरेश मोकळ, विश्वकर्मा समाजाचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. विजय भातनकर यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र पगारे यांनी आभार मानले.
संपादन - सुस्मिता वडतिले