esakal | श्री भगवतीदेवीचा दरबार नवरात्रोत्सावातही राहणार बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Shri Bhagwati Devi Darbar will also be closed during Navratra celebrations

साडेतीन शक्ती पिठाचा श्री भगवतीदेवीचा दरबार नवरात्रोत्सावातही बंद राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्ट व गावक-यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

श्री भगवतीदेवीचा दरबार नवरात्रोत्सावातही राहणार बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हार (अहमदनगर) : साडेतीन शक्ती पिठाचा श्री भगवतीदेवीचा दरबार नवरात्रोत्सावातही बंद राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्ट व गावक-यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

आदिशक्तीचा यंदाचा जागर साध्या पद्धतीने होणार असल्यामुळे भाविकांमधील नवरात्राचा दरवर्षीचा उत्साह मावळला आहे. यावर्षी फक्त देवीची पारंपारिक घटस्थापना पूजाअर्चा व इतर धार्मिक विधी केले जाणार आहेत. ते सुधा मंदिरातील सेवेकरी व पुजारीच करतील अन्य कोणालाही मंदिरात प्रवेश राहणार नाही. देवीची काकड आरती व सांज आरतीला भाविकांना आदिशक्तीच्या दरबारात थांबता येणार नाही.तसेच आरतीच्या वेळी मंदिराच्या परिसरात गर्दी करता येणार नाही. देवीचे दर्शन घेण्यासाठी गाभा-यापर्यंत प्रवेश मिळणार नाही. त्याऐवजी होमकुंडाजवळील प्रवेशद्वाराजवळ देवीच्या पादुकांवर माथा टेकविण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

प्रथा व परंपरेप्रमाणे कोल्हारच्या व भगवतीपुरच्या पाटलांसह इतरही तळीचा व माळेचा कार्यक्रम तसेच परगावाहून देवीच्या ज्योती घेवून येणा-याना प्रतिबंध राहील. मंदिर व परिसरात घटी बसण्यासाठी महिलांना ट्रस्टने मनाई केली आहे. 

मंदिर परिसरात खेळणीचे, कटलरीचे, प्रसाद, पूजा साहित्य, खाद्य पदार्थांच्या विक्रीची दुकाने व इतर कोणतीही नवीन दुकाने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोनामुळे 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' म्हणूनच सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी व मंदिर प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन देवालय ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. 

या बैठकीला ट्रस्टचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रघुनाथ खर्डे, माजी अध्यक्ष अॅड. सुरेंद्र खर्डे,
नंदकुमार खांदे, बाळासाहेब दा. खर्डे, श्रीकांत खर्डे, दिनकर कडसकर, प्रा. बापूसाहेब देवकर, भाऊसाहेब प्रभाकर खर्डे, मधुकर दा. खर्डे व उपसरपंच अशोक दातीर उपस्थित होते. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image