
चंपतराय म्हणाले, 'श्री क्षेत्र देवगडच्या धर्तीवर अयोध्येत गोशाळा व भक्तनिवास उभारणार आहोत. दरम्यान, त्यांनी मंदिर परिसर तसेच प्रवरा नदीच्या तीरावर पाहणी केली.
नेवासे (अहमदनगर) : अयोध्यातील राम मंदिर निर्माण कार्यात सर्वांचा सहभाग असावा, यासाठी येत्या (ता. १५) जानेवारी पासून फेब्रुवारी या कालावधीत मंदिर निर्माण व्यापक निधी अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विकास समितीचे महासचिव चंपतराय यांनी दिली.
श्रीक्षेत्र देवगड येथे चंपतराय यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. देवगड संस्थानचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रांताध्यक्ष आप्पा बारगजे, विभागीय अध्यक्ष ऍड.सुनीलचावरे, सरपंच अजय साबळे उपस्थित होते.
चंपतराय म्हणाले, 'श्री क्षेत्र देवगडच्या धर्तीवर अयोध्येत गोशाळा व भक्तनिवास उभारणार आहोत. दरम्यान, त्यांनी मंदिर परिसर तसेच प्रवरा नदीच्या तीरावर पाहणी केली. यावेळी त्यांना किसनगिरी बाबांची तपोभूमी, देवगड संस्थानच्या गोशाळा, भक्तनिवाससह संस्थान याविषयी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी माहिती दिली.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रांताध्यक्ष आप्पा बारगजे यांनी श्रीराम मंदिर न्यासासाठी २१ लाखांची देणगी देण्याची घोषणा केली.
संपादन - सुस्मिता वडतिले