
श्रीगोंदे : बारावीच्या पेपर फुटीची साखळी
श्रीगोंदे : बारावीची गणित विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याचे लोण आता नगर, बीडपर्यंत जात असल्याचे समजते. श्रीगोंदे पोलिसांनी वीस विद्यार्थ्यांकडे हा पेपर मोबाईलमध्ये असल्याने त्यांच्याकडे चौकशी केल्याची माहिती आहे. तथापि पोलिस याबद्दल कुठलीही माहिती लीक होऊ देत नसून, तपास सुरू आहे एवढेच सांगत आहेत.
बारावीचा गणित विषयाचा पेपर सुरू होण्यापूर्वीच अनेक विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये असल्याने तो पुढे आले. सदर फुटलेली प्रश्नपत्रिका गटशिक्षणाधिकारी सुनील वाळके यांना मिळाल्यावर पेपर फुटल्याचे त्यांना समजले. तोपर्यंत शिक्षण विभाग व परीक्षा केंद्रचालकांना कुठलीही कल्पना नव्हती, हे विशेष आहे.
दरम्यान, दोन दिवसांपासून श्रीगोंदे पोलिसांचा तपास सुरू आहे. यात अनेक विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली जात आहे. कुणाच्या मोबाईलवर कुणाकडून प्रश्नपत्रिका आली, याची चौकशी सुरू आहे. वीसपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची यात चौकशी झाली आहे. यात नगर व आष्टी (बीड) पर्यंत साखळी गेली आहे. त्याची व्याप्ती अजून वाढेल अशी शक्यता व्यक्त होत आहे.
तालुक्यातील एक क्लास शिक्षकाचीही चौकशी झाल्याचे समजते. तथापि पोलिस याबाबत अधिकृत माहिती देत नाहीत.
तपास सुरू आहे. आम्ही रोज अपडेट देऊ शकत नाही. तपास पूर्ण होईपर्यंत काहीही सांगणार नाही.
- रामराव ढिकले, पोलिस निरीक्षक, श्रीगोंदे.
Web Title: Shrigond Police Investigation Twelfth Paper Foot
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..