
श्रीगोंदे बाजार समितीचे संचालक लक्ष्मण नलगे यांचे चिरंजीव व्यवसायीक दादा नलगे (वय ३६) याने रिव्हॉल्व्हरमधुन स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.
श्रीगोंदे (अहमदनगर) : श्रीगोंदे बाजार समितीचे संचालक लक्ष्मण नलगे यांचे चिरंजीव व्यवसायीक दादा नलगे (वय ३६) याने रिव्हॉल्व्हरमधुन स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास दौंड येथील राहत्या घरी ही घटना घडली. आत्महत्या मागचे कारण मात्र समजू शकले नाही.
माजीमंत्री व विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचे सहकारी असणारे लक्ष्मण नलगे यांना सुधीर व दादा ही दोन मुले आहेत. त्यापैकी दादासाहेब हा दौंड येथील दौड येथील व्यवहार पाहत होता त्यांच्याकडे परवानाधारक रिव्हॉल्व्हर होता.
दादा याने दिवसापुर्वी लग्नाचा वाढदिवस साजरा केला. सोशल मिडीयावर फोटो टाकले. त्यानंतर ही दुदैघटना घडली. त्याचे मागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे.
संपादन : अशोक मुरुमकर