

Police personnel investigate the case following the death of a 75-year-old woman in Nimbodi village, Shrigonda.
esakal
श्रीगोंदे : कौटुंबिक कारणातून सुनेने सासूवर कुऱ्हाडीने हल्ला केला. यामध्ये सासू गंभीर झाली. उपचारादरम्यान सासूचा मृत्यू झाला. या प्रकरणी श्रीगोंदे पोलिसांनी संशयित सुनेला अटक केली. मृणाली नवनाथ बोरुडे (वय ३७, रा. निंबोडी, मांडवगण, ता. श्रीगोंदे) असे आरोपीचे नाव आहे. निंबोडी (ता. श्रीगोंदे) येथे ३१ ऑक्टोबरच्या रात्री अकरा ते १ नोव्हेंबरच्या पहाटे तीनच्या दरम्यान ही घटना घडली.