
श्रीगोंदे - तालुक्याच्या पूर्वेकडील गावात अंदाजे एकवीस वर्षीय विवाहितेचा खून झाल्याची घटना रविवारी(ता.१९) उघडकीस आली. मयत विवाहितेच्या पतीने स्वतःच पोलीस ठाण्यात हजर होत आपण पत्नीचा खून केला असल्याचे पोलिसांना सांगितले. याबाबत पोलिसांनी मयताच्या नातेवाईकांशी संपर्क केला असून सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.