अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shrigonda crime update Life imprisonment for abusing minor girl ahmednagar

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेप

श्रीगोंदे : अल्पवयीन मुलगी अंघोळ करत असताना तिचे व्हिडिओ चित्रिकरण काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. रामदास रोहिदास मोरे (वय 35, रा. हिरडगाव, ता. श्रीगोंदे) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. श्रीगोंदे येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांनी हा निकाल दिला.

श्रीगोंदा तालुक्‍यातील एका गावात अल्पवयीन मुलगी आई व बहिणीसोबत राहत होती. रामदास मोरे याने त्या मुलीचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ चित्रिकरण केले होते. त्याने ते चित्रिकरण त्या मुलीला दाखवुन, सांगेल तसेच तुला करावे लागेल, अन्यथा मी तुझे चित्रिकरण व्हायरल करेल, अशी धमकी दिली होती. त्याच्या धमकीला घाबरून त्या मुलीने घरी कोणालाही काहीच सांगितले नव्हते. एक दिवस मुलीची आई मजुरी कामाला गेल्यानंतर रामदास याने तिला त्याच्या घरी बोलून घेतले. अंघोळ करतानाचे चित्रिकरण दाखवून धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतरही वेळोवेळी पीडितेला धमकी देत अत्याचार केला. यातून पीडिता गर्भवती राहिली आणि एका बाळाला जन्म दिला. याबाबत पीडितेने श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रामदास मोरे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कर्जत विभागाचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक व्ही. एम. पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने पाच साक्षीदार तपासले. यामध्ये पीडिता, ग्रामसेवक, डॉक्‍टर, तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. सदर खटल्यामध्ये न्यायालयाने सरकारी पक्षाचा सबळ पुरावे ग्राह्य धरून आरोपी रामदास रोहिदास मोरे याला अत्याचार तसेच बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्‍सो) कलमान्वये दोषी धरून त्यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. सदर खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने पुष्पा कापसे-गायके यांनी काम पाहिले.

Web Title: Shrigonda Crime Update Life Imprisonment For Abusing Minor Girl Ahmednagar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top