श्रीगोंदे नगरपालिकेच्या नगरसेवकांची सिमल्याला ‘अभ्यास’ सहल!

श्रीगोंद्याचे पदाधिकारी व्यवस्थापनाचे धडे घेणार की पर्यटन करणार?
Shrigonda Municipality corporators to Simla
Shrigonda Municipality corporators to Simlasakal

श्रीगोंदे : श्रीगोंदे नगरपालिकेचे नगरसेवक मंगळवारपासून (ता. १) तीन दिवसीय अभ्यास दौऱ्यासाठी शिमला (हिमाचल प्रदेश ) या ठिकाणी जाणार आहेत. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हरर्नमेंट या संस्थेने २ ते ४ मार्च या कालावधीत महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमातील महत्त्वाच्या तरतुदी, सभा शास्त्र आणि घनकचरा व्यवस्थापन या विषयावर हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याचा शहराला फायदा होणार की नगरसेवकांची सहल होणार हे थोड्याच दिवसात समजेल.

तीन वर्षांपूर्वी येथील नगरसेवकांची अशाच पध्दतीची गोवा ट्रीप झाली होती. सहकुटुंब प्रशिक्षणासाठी गेलेल्या नगरसेवकांनी त्याचा किती फायदा शहराला दिला, हे गुलदस्त्यात आहे. आता पुन्हा एकदा सिमला येथे प्रशिक्षण आयोजित केले. या प्रशिक्षणात नगरसेवकांना मिळणाऱ्या प्रशिक्षणात विविध विषयावर मार्गदर्शन होणार आहे. नागरी सुविधा वितरण व लोकप्रतिनिधींच्या जबाबदाऱ्या, कर शुल्क आकारणी करण्यासंबंधी अधिनियमातील तरतुदी नगरपालिका कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी, सभेचे इतिवृत्त, गणसंख्या अध्यक्षांचे अधिकार, नगरसेवकांचे अधिकार सभेत, बोलण्याच्या पद्धती, सभेत प्रश्न-उपप्रश्न विचारण्याच्या तरतुदी घन कचऱ्याचे वर्गीकरण साठवणूक व घरोघरी इमारत कचरा गोळा करण्याच्या विविध पद्धती व वाहतूक कचऱ्यावरील अंतिम प्रक्रिया विल्हेवाटीचे पद्धती शून्य कचरा विकेंद्रित प्रक्रिया संकल्पना, स्वच्छ भारत अभियान आवश्यक बाबी, घनकचरा व्यवस्थापन शहर स्वच्छता व विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, जनजागृतीचा कार्यक्रम, आणि माहिती शिक्षण प्रबोधन आणि संपर्क व शहर सूचनेत सातत्य यासंबंधी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

नोव्हेंबर २०१९मध्ये गोवा या ठिकाणी नगरसेवक अभ्यास दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यावर दोन लाख २५ हजार रुपये खर्च झाले. सदर प्रशिक्षण वर्गासाठी उपस्थित असल्याबाबतचे संबंधित संस्थेने प्रशिक्षण प्रमाणपत्र अथवा उपस्थित असलेले प्रमाणपत्र तपासणीस मिळाले नसल्याची २०१९-२० च्या लेखापरीक्षण अहवालात नमूद केले आहे. या अभ्यास दौऱ्यावर चाललेल्या नगरसेवकांचा शहराला फायदा होणार की केवळ सहल होणार असा प्रश्न आहे. आता सव्वातीन लाखांचा खर्च होणार आहे. त्यामुळे नगरसेवकांनी तेथे केलेल्या अभ्यासाचा फायदा शहराला द्यावा, अशी अपेक्षा आहे.

या अभ्यासदौऱ्यासाठी प्रती नगरसेवक १५ हजारांचा खर्च नगरपालिका फंडातून करण्याच्या सूचना आहेत. त्याप्रमाणे नियोजन केले आहे.

- मंगेश देवरे, मुख्याधिकारी नगरपालिका, श्रीगोंदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com