श्रीगोंद्यात अध्यक्ष-उपाध्यक्ष बनले नामधारी, सह्याचे दुसरेच अधिकारी

संजय आ. काटे
Thursday, 24 September 2020

तालुका खादी ग्रामोद्योग संघात 11 संचालक आहेत. त्यातील 6 संचालकांनी गेल्या आठवड्यात नाहाटा यांच्या नेतृत्वाखाली शुभम घाडगे यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी रज्जाक शेख यांची निवड झाली.

श्रीगोंदे : श्रीगोंदे खादी ग्रामोद्योग संघाच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडी गेल्या आठवड्यात झाल्या. त्यात बाळासाहेब नाहाटा यांच्या गटाने बाजी मारली.

सह्यांचे अधिकार घेण्यासाठी आयोजित बैठकीस अध्यक्ष-उपाध्यक्ष हजर झाले. मात्र, विरोधी संचालकांनी बहुमत करीत त्यांना सह्यांचे अधिकारही मिळू दिले नाहीत. त्यामुळे अध्यक्ष-उपाध्यक्ष नामधारी राहिल्याचे चित्र आहे. 

तालुका खादी ग्रामोद्योग संघात 11 संचालक आहेत. त्यातील 6 संचालकांनी गेल्या आठवड्यात नाहाटा यांच्या नेतृत्वाखाली शुभम घाडगे यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी रज्जाक शेख यांची निवड झाली.

नियमानुसार या दोघांना सह्यांचे अधिकार देण्यासाठी बैठक आयोजित केली होती. मात्र, तीत सहा संचालकांनी विरोधात मतदान करीत, त्यांना सह्यांचे अधिकार मिळू दिले नाहीत. त्यात बापूराव गायकवाड, नाना ससाणे व अशोक शिंदे या संचालकांनी सत्ताधारी गटावर कुरघोडी करण्यात महत्वाची भूमिका पार पाडली. 

संचालक संजय शिंदे व नंदकुमार ससाणे यांच्याकडे सह्यांचे अधिकार दिले आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्षांना नामधारी ठरविण्याचा विरोधी संचालकांचा डाव यशस्वी झाला, किंबहुना काठावरचे बहुमत असणाऱ्या खादी ग्रामोद्योग संघात पुढच्या बैठकीपर्यंत कोणाकडे बहुमत राहील, हे आज सांगता येत नसल्याचे एका संचालकाने सांगितले. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Shrigonda, the office bearers do not have the right to sign