esakal | लिंबू व्यापारी व बाजार समितीचा वाद टोकाला; कोरोनाचे कारण देत लिलाव बंद करण्याचा घेतला निर्णय 

बोलून बातमी शोधा

Benefit to 5 lakh 52 thousand people from Mahatma Phule Backward Classes Development Corporation

श्रीगोंद्यात लिंबू दरावरुन सुरु झालेले वादंग आता पेटले आहे. बाजार समिती व लिंबू व्यापाऱ्यांमधील संघर्ष चांगलाच वाढला असून त्यातच आता कोरोनाचे कारण देत तालुक्यातील व्यापाऱ्यांनी 12 जुलैपासून लिंबू खरेदी बंद करण्याचे थेट पत्रच समितीला दिले आहे. आता बाजार समिती व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचे पाऊल उचलत असल्याची चर्चा आहे.

लिंबू व्यापारी व बाजार समितीचा वाद टोकाला; कोरोनाचे कारण देत लिलाव बंद करण्याचा घेतला निर्णय 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे (अहमदनगर) : श्रीगोंद्यात लिंबू दरावरुन सुरु झालेले वादंग आता पेटले आहे. बाजार समिती व लिंबू व्यापाऱ्यांमधील संघर्ष चांगलाच वाढला असून त्यातच आता कोरोनाचे कारण देत तालुक्यातील व्यापाऱ्यांनी 12 जुलैपासून लिंबू खरेदी बंद करण्याचे थेट पत्रच समितीला दिले आहे. आता बाजार समिती व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचे पाऊल उचलत असल्याची चर्चा आहे. 
तालुक्यात लिंबाचे दर व्यापाऱ्यांनी पाडल्याचे 'सकाळ'ने सर्वात प्रथम पुराव्यानिशी प्रसिध्द केले होते. त्यानंतर व्यापाऱ्यांनी लिंबाचा दर दुपटीपेक्षा जास्त वाढवून दिला. मात्र मधल्या काळात पुन्हा दर कमी झाले. त्यावेळी शेतकरी व त्यांचे प्रतिनिधींनी याबाबत बाजार समितीला विचारणा केली. त्यानंतर समिती आवारात लिलाव सुरु झाले. मात्र दोन दिवसानंतर तेही बंद झाले. त्यामुळे व्यापाऱ्यांशी शेतकऱ्यांचा संघर्ष वाढू नये यासाठी नेत्यांनी बैठक घेतली. बैठकीत नेमके काय ठरले आणि त्याचे पुढे काय झाले याची विचारणा कुठल्याही नेत्यांनी केली नसल्याचे समजते. 
त्यातच आता हा संघर्ष ऐरणीवर आला आहे. कारण कोरोनाचे कारण देत व्यापाऱ्यांनी रविवारपासून तालुक्यातील लिंबू खरेदी बंद करीत असल्याचे पत्र समितीला दिले आहे. विशेष म्हणजे हे पत्र समितीचे उपसभापती वैभव पाचपुते यांनीच व्हायरल केले. शिवाय त्यांनी व्यापाऱ्यांना धडा शिकविण्याची भाषाही सोशल मिडीयात वापरली. त्यामुळे व्यापारी व समिती यांच्यातील हा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. 

संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश बोरुडे म्हणाले, व्यापाऱ्यांनी लिंबू खरेदी बंद केली तरी शेतकऱ्यांच्या लिबांची खरेदी करण्याची जबाबदारी बाजार समितीची आहे. यात समितीने काय करायचे ते ठरवावे. शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आणू नये.

बाजार समितीचे व्यापारी संचालक उमेश पोटे म्हणाले, लिलाव व लिंबू खरेदी करताना गर्दी होत असल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे. समितीतील काही लोक आम्हाला कसा त्रास देतात हे लवकरच एकत्र जाहीर करु. व्यापाऱ्यांना नाहक बदनाम करण्याचे षडयंत्र सुरु आहे.

बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे म्हणाले, शेतकरी व व्यापारी हा समितीचा कणा आहे. आम्ही यातून मार्ग काढू. कुणाचेही नुकसान होणार नाही याची दक्षता बाजात समिती व्यवस्थापन घेत असून चर्चेतून मार्ग काढू.

संपादन : अशोक मुरुमकर