"कुकडी'चे आवर्तन सुटले पण... श्रीगोंद्याला मिळणार 25 जूननंतरच पाणी 

Shrigonda will get water only after June 25
Shrigonda will get water only after June 25
Updated on

श्रीगोंदे : कुकडी प्रकल्पातून ज्या दिवशी ठरले त्याच दिवशी आवर्तन सोडण्यात आले. काल शनिवारी रात्री येडगाव धरणातून पाचशे क्‍युसेक्‍सने पाणी सुरू करण्यात आले. श्रीगोंद्याच्या वाट्याला पाच दिवसांचे प्रत्यक्षातील आवर्तन येत आहे. 

कुकडी धरणातील आवर्तनावरून श्रीगोंदे व कर्जत (जि. अहमदनगर) तालुक्‍यात गेल्या काही दिवसांत राजकारण तापले होते. दरम्यान, आता आवर्तन सुटल्याने चर्चा थांबणार असल्या तरी खऱ्या अडचणीही सुरू झाल्या आहेत. कारण, श्रीगोंद्याच्या वाट्याला पाच दिवसांचे आवर्तन येत असून 410 दशलक्षघनफूट पाणी येत आहे. कर्जतला सात दिवस आणि करमाळ्याला सहा दिवसांचे आवर्तन सुटणार आहे. श्रीगोंद्याला पाणी येण्यास 25 जून उजाडणार आहे. त्यानंतर पाणी सुरुवात होईल. 
श्रीगोंद्यातील पाझर तलावांना पाणी देण्याबाबत अधिकारी विचार करीत असतानाच त्यांना आमदार बबनराव पाचपुते यांनी पाझर तलावात पाणी सोडण्याची यादी देत तेथे पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. हे आवर्तन शेतीचे करण्याचे स्थानिक पातळीवर ठरले आहे. 

विसापूरचे आवर्तन लांबले 
दरम्यान, आमदार पाचपुते यांच्या उपोषणात विसापूरचे आवर्तन सोडण्याची तयारी दाखविणाऱ्या कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांनी घूमजाव करीत निर्णय फिरविला आहे. कुकडीचे काही पाणी विसापूरमध्ये घेऊन विसापूरचे आवर्तन करू असे त्यांनी पाचपुते यांना सांगितले असून तसाच निर्णय झाल्याचे काळे यांनी सकाळला सांगितले. मात्र आता विसापूरचे आवर्तन थेट जूलैमध्ये सोडणार का? असा प्रश्न उपस्थितीत होत असून विसापूरच्या शेतकऱ्यांवर ठरवून जलसंपदा विभागाने अन्याय केल्याचे स्पष्ट झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Worked by Day, Trained at Dawn: Sangamner Youth Achieves His Police Dream
DNA Test to Solve Rahuri Burial Mystery After Missing Man Reappears Alive
Temple Visit Turns Political: Srikant Shinde Slams Opposition Over Hindutva Stand
Satyajeet Tambe
Marathi News Esakal
www.esakal.com