
श्रीरामपूर : मध्यप्रदेशकडून कोपरगाव, पुणतांबेमार्गे श्रीरामपूरला गांजा घेऊन येणाऱ्या दोन व्यक्तींना पोलिसांनी पिकअप वाहनासह अटक केली. मंगळवारी पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास अपर पोलिस अधीक्षक व तालुका पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींकडून गांजासह सात लाख ६२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयाने १० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.