बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारात नेहमीच भुसार मालाची मोठी आवक असते. परंतू आडत व्यापाऱ्यांच्या शेडमध्ये लिलाव होत. असल्याने आडत्या देईल तो दर शेतकऱ्यांना मिळतो. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसा होत. म्हणुन बाजार समितीने लिलाव पध्दतीत बदल करण्याचा निर्णय घेतल्याने सोमवारचे लिलाव खुल्या प्रकारे होणार आहे.
श्रीरामपूर ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान येथील उपबाजारात सोमवार (ता.19) पासुन भुसार मालाचे खुले लिलाव सुरु करण्याचा निर्णय बाजार समिती व्यवस्थापनाने नुकताच घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भुसार मालाला योग्य दर मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारात नेहमीच भुसार मालाची मोठी आवक असते. परंतू आडत व्यापाऱ्यांच्या शेडमध्ये लिलाव होत. असल्याने आडत्या देईल तो दर शेतकऱ्यांना मिळतो. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसा होत. म्हणुन बाजार समितीने लिलाव पध्दतीत बदल करण्याचा निर्णय घेतल्याने सोमवारचे लिलाव खुल्या प्रकारे होणार आहे.
त्यानुसार शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या मालाची वाहने आवारात रांगेत उभी करावी लागणार आहे. यावेळी लिलाव पुकारण्यासाठी बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित राहणार आहे. तर व्यापारी दर काढणार असुन बोलीचे तीन वार झाल्यानंतर सदर माल संबधीत व्यापारी खरेदी करणार आहे.
खरेदी केलेल्या धान्याचे मोजमाप अधिकृत मापाड्याकडुन केल्यानंतक खरेदीदार व्यापाऱ्यांच्या गोदामात माल जाणार आहे. धान्याची पट्टी रोख रक्कम अथवा धनादेशाद्वारे पैसे अदा केले जाणार आहे.
आदा केलेल्या पैशांची नोंद असलेली एक प्रत बाजार समितीकडे जमा केली जाणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. बाजार समितीने घेतलेल्या निर्णयामुळे भुसार आडत व्यापाऱ्यांकडुन होणारी शेतकर्यांची लुट काहीअंशी कमी होणार आहे. तसेच बाजार समितीचे कर्मचारी खुले लिलाव करणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहेत.
संपादन - अशोक निंबाळकर