श्रीरामपूर तालुक्यात जुगार अड्डयावर छापा; १० जण ताब्यात

गौरव साळुंके
Wednesday, 11 November 2020

शिवाजीरस्ता परिसरासह प्रभाग तीनमधील साई टेकडीसमोरील जुगार अड्डयावर मंगळवारी रात्री छापा टाकून १० जणांना ताब्यात घेतले.

श्रीरामपूर (अहमदनगर) : शहर पोलिसांनी येथील शिवाजीरस्ता परिसरासह प्रभाग तीनमधील साई टेकडीसमोरील जुगार अड्डयावर मंगळवारी रात्री छापा टाकून १० जणांना ताब्यात घेतले. याबरोबर विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत दोन लाखांचा ऐवज जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

विविध ठिकाणच्या जुगार आड्यांवर आढळलेल्या दहा आरोपीविरुद्ध रात्री शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासुन पोलिस पथकाने विविध ठिकाणी छापे टाकून शहरातील अवैध व्यवसायांवर कारवाई केली. या पार्श्वभूमीवर काल रात्री शिवाजी रस्त्यासमोरील एका जुगार अड्डयावर छापा टाकला. तसेच प्रभाग तीन परिसरातील साई टेकडी समोरील एका जुगार अड्ड्यावरही पोलिस पथकाने छापा टाकला. 

पोलिसांनी विविध ठिकाणाहून दहा जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस उपधीक्षक संदीप मिटके यांच्यासह प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी केली. पोलिस पथकाने विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत दोन लाखांचा ऐवज जप्त करुन दहा जणांना ताब्यात घेतले. शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल केल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shrirampur police 10 arrested in raid on Jugar Adda