
श्रीरामपूर : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये आपल्या माता-भगिनींचे कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा बदला भारतीय सैन्याने मिशन सिंदूर राबवून अखेर घेतला. भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला आणि ते उद्ध्वस्त केले. हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर हे योग्य नाव देऊन माता-भगिनींचं कुंकू पुसणाऱ्यांचा हिशेब चुकता केल्याचे मत तिलक डुंगरवाल यांनी व्यक्त केले.