
श्रीरामपूर : ९५ वर्षांची परंपरा लाभलेल्या श्रीराम नवमी यात्रोत्सवास रविवारी (ता.६) पासून सुरुवात होत आहे. रामजन्मानंतर भगवे झेंडे मिरवणुकीने आणून ते मंदिरावर चढविले जातात. याचा सुरुवातीपासून मान तहसील कचेरी, शहर व तालुका पोलिस ठाण्यांना आहे. याप्रमाणेच सायंकाळी निघणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेची रथातून मिरवणूक निघते. हा रथ ओढण्याचा मान गोंधवणी येथील वतनदार असलेले बाळा गोविंदा गायकवाड यांच्या कुटुंबाला यात्रेच्या दुसऱ्या वर्षी १९३१ सालापासून देण्यात आला.