श्रीरामपूर तालुक्यातील घडामोडी; अनिसची कार्यकारिणी जाहीरसह इतर बातम्या

गौरव साळुंके
Tuesday, 13 October 2020

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तालुका अध्यक्षपदी प्राचार्य पोपट शेळके तर कार्यध्यक्षपदी दादासाहेब साठे यांची सर्वानुमते निवड झाली आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तालुका अध्यक्षपदी प्राचार्य पोपट शेळके तर कार्यध्यक्षपदी दादासाहेब साठे यांची सर्वानुमते निवड झाली आहे.

अनिसची नुकतीच बैठक पार पडली. त्यात पुढील तीन वर्षांसाठी नूतन कार्यकारणी जाहिर करण्यात आली. बैठकीला सुनील साळवे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी प्रा. प्रतिज्ञा पत्की, सचिवपदी प्रविण साळवे, कोषाध्यक्षपदी प्रमोद पत्की, प्रा. सुप्रिया साळवे, राजेंद्र केदारी, प्रतापराजे भोसले, सुनील साळवे, सुरेश वाघुले यांच्या निवडी करण्यात आल्या आहे. तसेच तालुका कार्यकरिणीमध्ये भरत कुंकुलोल, संतोष जाधव, सुरंजन साळवे, पराग कारखानीस, उल्हास मराठे, संजय दुशिंग, बाळासाहेब सोनटक्के यांचा समावेश आहे. या निवडीबद्दल अनिसच्या कार्यवाहक रंजना गवांदे यांनी नुतन पदाधिकार्यांचे अभिनंदन केले.

नामानिराळा पुस्तकाचे प्रकाशन
श्रीरामपूर : तालुक्यातील ग्रामीण साहित्यिक नामदेवराव देसाई लिखीत नामानिराळा पुस्तकाचे लवकरच प्रकाशन होणार असल्याची माहिती येथील स्नेहप्रकाश प्रकाशनचे संचालक प्रकाश कुलथे यांनी दिली. नगर जिल्ह्यातील लोकप्रिय ग्रामीण साहित्यिक म्हणुन नामदेवराव देसाई यांची सर्वत्र ओळख आहेत. त्यांची पंचनामा, भ्रष्ट्राचार कसा करावा पुस्तके प्रसिध्द आहेत.

नाट्य, सिनेमा, राजकारण, समाजकारण, शिक्षण अशा विविध क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे. माजी मंत्री शंकरराव कोल्हे, माजी प्राचार्य टी. ई. शेळके, प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे प्राचार्य डॉ. अशोक शिंदे, डॉ. शिरीष लांडगे यांच्याशी त्याचा संपर्क आल्याने त्यांचे लेखन वाचनीय आहे. देसाई हे आता वयाच्या 81 व्या वर्षाकडे वाटचाल करीत आहे. त्यांच्या नामानिराळा पुस्तकाचे संपादन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले असुन त्यात यांचा जीवन प्रवासाचा सार आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shrirampur taluka all news from one click