शेतकरी कायद्याविरोधात २५ हजार शेतकऱ्यांच्या सह्या

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 December 2020

जनता बळामुळे केंद्राला शेतकरी आणि कामगार विरोधी कायद्यामध्ये बदल करण्यास भाग पडणार असल्याचा इशारा कॉंग्रसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकात दिला आहे.

श्रीरामपूर : केंद्र सरकारने हुकूमशाही पद्धतीने शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे मंजूर केले आहेत. त्याविरोधात प्रदेश कॉंग्रेस समितीतर्फे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सह्यांची मोहीम राबविली. 

त्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात आमदार लहु कानडे आणि युवक कॉंग्रेसचे महासचिव करण ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली 25 हजार सह्या प्रदेश कॉंग्रेस समितीकडे सुपूर्द केल्याची माहिती कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण नाईक व शहराध्यक्ष संजय छल्लारे यांनी दिली.

केंद्र सरकारने हुकूमशाही पध्दतीने शेतकरी, कामगार विरोधी कायदे मंजूर केले. त्याविरोधात देशभर सर्वत्र विरोध असताना महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सह्यांची मोहीम राबविली. त्यात श्रीरामपूर मतदारसंघाने सक्रिय सहभाग नोंदवला. कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मोहीम यशस्वी केली.

जनता बळामुळे केंद्राला शेतकरी आणि कामगार विरोधी कायद्यामध्ये बदल करण्यास भाग पडणार असल्याचा इशारा कॉंग्रसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकात दिला आहे. शेतकरी आणि कामगार हितासाठी कॉंग्रेस कटिबद्ध असून वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा यांनी दिला.

ज्येष्ठ नेते उपाध्यक्ष इंद्रनाथ थोरात, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, संजय फंड, ज्ञानेश्वर मुरकुटे, आशा दिघे, मंगला पवार, डॉ. वंदना मुरकुटे यांनी दिला. 

अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Signatures of 25,000 farmers against the Farmers Act