कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 October 2020

जिल्ह्यात आज 459 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 92.06 झाली आहे. आजअखेरपर्यंत 47 हजार 293 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

नगर ः कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढत आहे. नव्याने रुग्ण सापडण्याची संख्याही कमी होताना दिसत आहे. आज दिवसभरात 365 रुग्ण आढळून आले. गेल्या दीड महिन्यातील ही निच्चांकी संख्या आहे. आतापर्यंत पाचशेच्या पुढे रुग्ण आढळून येत होते. 

जिल्ह्यात आज 459 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 92.06 झाली आहे. आजअखेरपर्यंत 47 हजार 293 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. नव्याने 365 रुग्ण आढळून आले. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या 51 हजार 375 झाली. सध्या 3290 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्हा रुग्णालयातील तपासणी अहवालात आज 81 बाधित आढळले. त्यात महापालिका हद्दीत 33, जामखेड चार, कर्जत तीन, नगर ग्रामीण तीन, नेवासे आठ, पारनेर दोन, श्रीगोंदे 21 व मिलिटरी हॉस्पिटलमधील सात जणांचा समावेश आहे. 

खासगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 63 बाधित आढळले. त्यात महापालिका हद्दीत 30, अकोले एक, जामखेड एक, कोपरगाव एक, नगर ग्रामीण दोन, नेवासे पाच, पाथर्डी दोन, राहाता पाच, राहुरी दोन, संगमनेर एक, शेवगाव सहा, श्रीगोंदे एक, श्रीरामपूर पाच व कॅन्टोन्मेंटमधील एकाचा समावेश आहे. 

अँटीजेन चाचणीत 221 बाधित आढळले. त्यात महापालिका हद्दीत 27, अकोले दहा, जामखेड 19, कर्जत 19, कोपरगाव 12, नगर ग्रामीण दोन, नेवासे 17, पारनेर 14, पाथर्डी 21, राहाता 12, राहुरी दोन, संगमनेर 28, शेवगाव 13, श्रीगोंदे 12, श्रीरामपूर दहा व कॅन्टोन्मेंटमधील एकाचा समावेश आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Significant reduction in the number of corona patients