पिचड का पडले? सीताराम गायकरांनी मॅच फिक्सिंग केले, भांगरेंचा आरोप

Sitaram Gaikar did match fixing in the assembly elections
Sitaram Gaikar did match fixing in the assembly elections
Updated on

अकोले : विधानसभा निवडणुकीत शरीराने भाजपमध्ये असलेल्या सीताराम गायकर, परबत नाईकवाडी यांनीच पक्षाचे उमेदवार वैभव पिचड यांना पराभूत केल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी केला. 

गायकर यांनी आपण 14 महिने भाजपमध्ये अस्वस्थ होतो. भाजप प्रवेशाचा फायदा झाला नसल्याचे वक्तव्य केले होते. त्याचा सीताराम भांगरे, भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी समाचार घेतला.

ते म्हणाले, की गायकर हे संधीसाधू असून, विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व गायकर यांच्यात मॅच फिक्‍सिंग झाले होते. त्यामुळे कुंपणानेच शेत खाल्ले. ज्यांच्या विश्वासावर माजी मंत्री मधुकर पिचड यांनी विधानसभा निवडणुकीचे सूत्रे दिली, त्यांनीच पिचड यांच्या पाठीत खंजीर खुपसला. 

जिल्हा बॅंकेतील गैरव्यवहार वाचविण्यासाठी ते राष्ट्रवादीत गेले आहेत. जिल्हा बॅंक नोकरभरती, फर्निचर खरेदी व्यवहारात मोठा गैरव्यवहार झाला आहे. तो लपविण्यासाठी अजित पवार यांच्या पदराआड लपण्याची वेळ गायकर यांच्यावर आल्याची टीका सीताराम भांगरे यांनी केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Police Tighten Noose Around Gender Testing Racket; More Arrests Likely After Fresh Seizure
Allegations Over Evaluation Process Prompt Fresh Review of Panchayats Across State
Pune Doctor Among Latest Arrests in Widening Illegal Foetal Sex Determination Network
Shepherd Loses Life in Massive Explosion After Handling Unexploded Bomb
Marathi News Esakal
www.esakal.com