
श्रीरामपूर : जुन्या भांडणातून शहरातील घासगल्लीत एकावर चॉपरने वार, तर दुसऱ्याला चाकू भोसकण्यात आला. तसेच एकाने पिस्तूल काढून गोळीबार केला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. एकास अटक करण्यात आली असून अन्य पसार आहेत.