कोविड सेंटर पेटवल्याप्रकरणी सहाजणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 4 October 2020

ती कोविड सेंटरमध्ये पसरविण्याचा प्रयत्न केला. कोविड सेंटरमधील असहाय रुग्ण व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नगर : सारसनगर परिसरातील कोविड सेंटरला आग लावून डॉक्‍टरांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून विजय रासकर याच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत डॉ. रोहित रमेश आहेर (रा. बालिकाश्रम रस्ता, नगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. 
विजय आसाराम रासकर, दीपक लक्ष्मण पवार, ऋषिकेश रासकर, आकाश रासकर, विनायक कुलकर्णी, कृष्णा दळवी (पूर्ण नावे समजली नाही) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. डॉ. आहेर यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की शनिवारी रात्री नऊ वाजता वरील आरोपींनी संगनमत करून कोविड सेंटर पेटवून देण्याच्या उद्देशाने स्पंदन मेडिकेअर सेंटरच्या बाहेरील हिरव्या जाळीला आग लावली.

ती कोविड सेंटरमध्ये पसरविण्याचा प्रयत्न केला. कोविड सेंटरमधील असहाय रुग्ण व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अहमदनगर
संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six persons have been booked for setting fire to the Kovid Center