esakal | टाटा मेमोरिअलसोबत एसएमबीटीचा करार : थोरात | Ahmednagar
sakal

बोलून बातमी शोधा

बाळासाहेब थोरात

टाटा मेमोरिअलसोबत एसएमबीटीचा करार : थोरात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संगमनेर : धामणगावच्या नंदी हिल्स येथील एसएमबीटी हॉस्पिटलच्या प्रांगणात मुंबईच्या टाटा मेमोरिअल सेंटरच्या सहकार्यातून कर्करोगावरील सर्व सुविधायुक्त आधुनिक उपचार सुरू होणार आहेत. त्यामुळे कर्करुग्णांना मुंबई- पुण्यासारख्या शहरांत जाण्याची आवश्यकता पडणार नाही. त्यांना या ठिकाणी माफक दरात उपचार मिळणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

एसएमबीटी हॉस्पिटलमधील कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, की कोरोना महामारीने पुरेशा व दर्जेदार आरोग्य सुविधांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. फक्त मोठ्या शहरातल्या पंचतारांकित रुग्णालयांमध्येच चांगल्या आरोग्य सुविधा व उपचार मिळतात, हा गैरसमज एसएमबीटी रुग्णालयाने खोडून काढला आहे. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना अत्यंत माफक दरात उत्तम आरोग्य सेवा पुरवीत आहे. कॅन्सर रुग्णांची वाढती संख्या पाहता, मानवसेवेच्या हेतूने एसएमबीटीने देशातील अग्रगण्य टाटा मेमोरिअल इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने स्वतंत्र उपचाराची व्यवस्था केली आहे.

राज्यातील रुग्णांना याचा लाभ मिळणार आहे. डॉ. राजेंद्र बडवे म्हणाले, की एसएमबीटी हॉस्पिटल ही टाटा मेमोरिअल सेंटरची महाराष्ट्रातील केवळ सर्वांत मोठी शाखाच नाही, तर स्वतः कॅन्सर हॉस्पिटल म्हणून नावारूपाला येईल. मुंबईच्या टाटा कर्करोग रुग्णालयातील मोठी प्रतिक्षा यादी यामुळे कमी होऊन, रुग्णांना त्वरित उपचार मिळतील.

या वेळी टाटा मेमोरिअल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे, उपसंचालक डॉ. पंकज चतुर्वेदी, आमदार डॉ. सुधीर तांबे, व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. हर्षल तांबे आणि विश्वस्त डॉ. जयश्री थोरात उपस्थित होते. डॉ. मीनल मोहगावकर यांनी प्रास्ताविक केले. डेप्युटी मेडीकल सुपरिंटेंडंट डॉ. संतोष पवार यांनी आभार मानले.

loading image
go to top