मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर सरकारला माफी नाही

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

राज्यातील सरकारने मराठा आरक्षणाचा मुद्दा गांभीर्याने घेऊन ते वाचविले नाही तर राज्यातील मराठा समाज या सरकारला कधीच माफ करणार नाही, अशी प्रतिक्रीया भाजपाच्या प्रदेश सचिव व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली. माजी आमदार कोल्हे म्हणाल्या, मराठा आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षापासून रखडलेला होता.

कोपरगाव (अहमदनगर) : राज्यातील सरकारने मराठा आरक्षणाचा मुद्दा गांभीर्याने घेऊन ते वाचविले नाही तर राज्यातील मराठा समाज या सरकारला कधीच माफ करणार नाही, अशी प्रतिक्रीया भाजपाच्या प्रदेश सचिव व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.
माजी आमदार कोल्हे म्हणाल्या, मराठा आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षापासून रखडलेला होता. कॉग्रेस, राष्ट्रवादी सरकारच्या काळात त्रुटी ठेवून सातत्याने प्रलंबित ठेवण्याचे काम झाले. परंतू मराठा आरक्षणाचा विषय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर येताच त्यांनी समाज बांधवांना दिलेल्या शब्दाप्रमाणे मराठा आरक्षणाचा विषय अंतिम टप्प्यात नेला. सरकार बदलताच मराठा आरक्षणाचा विषय पुर्ण करून घेण्याची जबाबदारी राज्यातील आघाडी सरकारची असल्याने त्यांनी यासाठी विशेष नियोजन केले पाहिजे. परंतू आजपर्यंत या सरकारने कोणत्याही प्रकारचे गांभीर्य घेतलेले दिसत नाही. त्यामुळे याप्रश्नी सरकारची अनास्था जनतेला समजली आहे. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात मराठा आरक्षणाचा विषय हाताळतांना अनेकांनी राजकीय भांडवल करून खोडा घालण्याचा प्रयत्न केला. परंतू न डगमगता कोणतेही पाऊल मागे न घेता मराठा आरक्षणाचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती भुमिका बजावली. त्याच पध्दतीची भुमिका या राज्यसरकारची आहे. लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य व रोजगाराचा प्रश्न आरक्षणावर अवलंबून आहे. त्यामुळे या ऐतिहासिक आरक्षणाच्या निर्णयाला सकारात्मक भुमिका ठेवून न्यायालयात टिकविण्याचे काम सरकारने करावे. परंतू राज्य सरकारला यामध्ये कोणतेही स्वारस्य दिसत नाही. मराठा समाजाच्या भावनांशी खेळण्यापेक्षा हा प्रश्न गांभीर्याने घेऊन आघाडी सरकारने आरक्षण टिकण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबी पुर्ण कराव्यात व या आरक्षणाला वाचविण्याचे काम करावे, अन्यथा जनता या राज्य सरकारला कधीच माफ करणार नाही असे माजी आमदार कोल्हे शेवटी प्रस्थित केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Snehalata kolhe comment of Maratha community does not get reservation then the government does not have an apology