Solapur News: राज्यातील सत्ताबदल अन् आमदार आवताडे नी वाढविला निधी टक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Samadhan Autade

Solapur News: राज्यातील सत्ताबदल अन् आमदार आवताडे नी वाढविला निधी टक्का

मंगळवेढा : राज्यातील सत्ताबदला लाभ उठवित आ समाधान आवताडे यांनी मतदारसंघात निधी मिळविण्याचा ओघ वाढविला असून मतदारसंघातील रस्ते मजबूतीकरण व सुधारणेसाठी 30:54,50:54 मधून 3 कोटी 67 लाख इतका निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.

या निधीमुळे मतदारसंघातील रस्तेच्या कामाला गती मिळणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीपुर्वी हा निधी भाजपासाठी महत्वपुर्ण ठरणारा आहे.

जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेकडील 30:54 व 50:54 या लेखा शीर्षकाअंतर्गतची इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण या वरील कामे व पंतप्रधान ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या सर्वांमध्ये समन्वय असावा या उद्देशाने जिल्हा वार्षिक योजनेकडे लेखा शीर्षकातील अंतर्गत प्राप्त होणार्‍या निधीमधून रस्त्यांची कामे होणार आहेत.

30:54 मधून मंजूर रस्ते व निधी

टाकळी विसावा ते कासेगाव,रांझणी -शिंदे वस्ती चळे ते रांझणी, माधवानंद नगर ते इजिमा 113 रस्ता 10 लाख, शेटफळ ते रा मा (संगेवाडी),येळगी ते पौट,येड्राव ते कागष्ट, मुंढेवाडी ते मोरे नवले वस्ती, रेवेवाडी ते तम्मा चौगुले वस्ती, शिवणगी ते चडचण तालुका हद्दीपर्यंत, हिवरगाव ते जोड रस्ता ते प्रजिमा 73 ला जोडणारा रस्ता,आंधळगाव ते महमदाबाद (शेटफळ), गणेशवाडी ते कचरेवाडी, महासिद्ध मंदिर ते डोणज रस्ता सुधारणा करणेसाठी प्रत्येकी 10 लाख, कासेगाव ते तावशी, तळसंगी ते भालेवाडी, सिद्धापूर ते अरळी, बावची ते पौट, तरटगाव ते सिद्धेवाडी रस्ता प्रत्येकी 8 लाख, भाळवणी ते जित्ती रस्ता सुधारणा करणे 15 लाख, नंदुर ते रेवतगाव रस्ता सुधारणा करणे 9 लाख, अरळी ते नंदुर रस्ता सुधारणा करणे 5 लाख, मंगळवेढा ते बठाण जोडणारा रस्ता सुधारणा करणे 20 लाख,

5054 योजनेअंतर्गत निधी मंजूर झालेले रस्ते

जुनोनी ते हाजापूर, भालेवाडी ते प्ररामा रस्ता, हुलजंती ते सलगर बु. ते उमदी जिल्हा हद्द रस्ता सुधारणा करणे प्रत्येकी 15 लाख, ब्रह्मपुरी- मुंढेवाडी- भालेवाडी,जालिहाळ - नंदेश्‍वर मध्ये रस्ता सुधारणा करणे प्रत्येकी 10 लाख, मरवडे ते डोणज रस्ता मध्ये सुधारणा करणे 11 लाख, लवंगी ते जाडरबबलाद रस्ता सुधारणा करणे 22 लाख, हिवरगाव ते तळसंगी, गुंजेगाव अकोला, मंगळवेढा रस्ता सुधारणा करणे प्रत्येकी 20 लाख.

राज्यातील सत्ताबदलाने रस्ते, वीज, पाणी, आरोग्याबाबत आतापर्यंतच्या निधीचा विचार करता अलिकडच्या काळात आ. आवताडे यांनी खेचून आणलेला निधी अधिक असून तो लक्षात राहण्याजोगा आहे.

उर्वरित कमी काळातही मतदारसंघातील प्रमुख प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी जास्तीचा निधी मिळवण्यात यशस्वी ठरतील

प्रा.श्याम आकळे हाजापूर