esakal | १३ लाखाचा सौर ऊर्जा प्रकल्प बंद; विजबिलाचा तोटा कसा भरुन काढायचा?
sakal

बोलून बातमी शोधा

Solar power project in Pathardi taluka panchayat samiti off Solar power project in Pathardi taluka panchayat samiti off

पंचायत समितीच्या कार्यालयात जिल्हा परीषदेच्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत बसविलेले सौर विद्युत सयंत्र दहा महीन्यापासुन बंद आहेत. सोनकुल एनर्जी प्रोडक्स कंपनीला चार वेळा सांगुनही ते दुरुस्त केले जात नाहीत.

१३ लाखाचा सौर ऊर्जा प्रकल्प बंद; विजबिलाचा तोटा कसा भरुन काढायचा?

sakal_logo
By
राजेंद्र सावंत

पाथर्डी (अहमदनगर) : पंचायत समितीच्या कार्यालयात जिल्हा परीषदेच्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत बसविलेले सौर विद्युत सयंत्र दहा महीन्यापासुन बंद आहेत. सोनकुल एनर्जी प्रोडक्स कंपनीला चार वेळा सांगुनही ते दुरुस्त केले जात नाहीत. त्यामुळे पंचायत समितीला विजेच्य़ा बिलाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. १३ लाख रुपयाचा हा प्रकल्प अर्ध्या क्षमतेने देखील चालत नाही. समितीला होणारा विजबिलाचा एक ते सव्वा लाखाचा तोटा कोणी भरुन काढायचा प्रश्न उभा राहीला आहे. 

कंपनीला ठेका व बिल जिल्हा परीषदेच्या पातळीवर दिलेले असल्याने कंपनी आमच ऐकत नाही, असा आरोप सभापती सुनिता दौंड यांनी केला आहे. पंचायत समितीच्या कार्यालयात विजेची बचत व्हावी व कार्यालय विजेच्या बाबतीत स्वयपुर्ण व्हावे, यासाठी जिल्हा परीषदेच्या जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत 2015-16 मध्ये सौर विद्युत सयंत्र खरेदी करण्यात आले. १३ लाख रुपये यासाठी खर्च केले. १८ मार्च 2017 ला पंचायत समितीच्या नवीन इमारतीमधे हे सौर संयत्र बसविण्यात आले. 

१० किलोवँट क्षमता असलेले हे सौरउर्जेचे युनिट सुरपवातीपासुन पुर्ण क्षमतेने सुरु झाले नाही. पंचायत समितीला १० ते १५ हजार रुपये विजबील महीन्याला भरावे लागते. ते ५० टक्के कमी भरावे लागले. मात्र सतत नादुरस्त होत असल्याने हे सयंत्र १३ डिसेंबर 2019 पासुन बंद पडलेले आहे. पंचायत समितीने सोनकुल एनर्जी प्रोडक्सला चार वेळा पत्रव्यवहार केला. कंपनीने बँट-यामधे तांत्रीक अडचण असल्याचे सांगितले. दुरुस्तीचे आश्वासन दिले. अद्याप सयंत्र बंद आहे. ते बंद असल्याने पंचायत समितीला महीन्याला दहा ते बारा हजार रुपये विजबील भरावे लागत आहे. दहा महीन्याचे सुमारे एक ते स्वावलाख रुपयाची विजबीलाचा तोटा समितीने का सहन करायचा. प्रकल्पाचा पाच वर्षाचा देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कंपनीवर आहे.

सौर उर्जेचा प्रक्लप खरेदी जिल्हा परीषदेच्या पातळीवर झालेली आहे. त्याचे बिलही जिल्हा पातळीवरच दिले गेले. प्रकल्प पुर्णत्वाच्या दाखल्यावर मी सही केलेली नाही. गेल्या दहा महीन्यापासुन बंद असल्याने आम्ही संबधीतांना चार वेळापत्रव्यवहार केला आहे. त्यांचा प्रतिसाद मिळत नाही, असे गटविकास अधिकारी डॉ. जदगिश पालवे यांनी सांगितले. 

सौरउर्जा विद्युत प्रकल्पाचे काम चांगले झालेले नाही. सुरवातीपासुनच पुर्ण क्षमतेने प्रकल्प चालत नाही. संभदीत कंपनीला वेळोवेळी सांगुनही दुरुस्तीचे काम केले जात नाही. बंद असलेल्या प्रकल्पचा पंचायत समितीला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. बंद असलेल्या काळातील विजबीलाची रक्कम कंपनीकडुन वसुल केला जाईल.
- सुनिता दौंड, सभापती पंचायत समिती, पाथर्डी
 

संपादन : अशोक मुरुमकर