Soldier Dies in Crash While Avoiding Pothole : कुटुंबातील इतर व्यक्ती मूळगावी रहात असल्याने खंडागळे शनिवारी सायंकाळी आईला भेटण्यासाठी अंतरवाली खुर्द या गावी दुचाकीहून जात होते. शेवगाव ते अंतरवाली खुर्द रस्त्यादरम्यान हसनापूर गावाजवळ रस्त्यावरील खड्डा चुकवताना झालेल्या अपघातात डांबरी रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला.
बोधेगाव : दुचाकीवरून गावी जात असताना रस्त्यातील खड्डा चुकवताना झालेल्या अपघातात सैन्यदलातील जवान अमोल बारीकराव खंडागळे (वय ३०) यांचा मृत्यू झाला. आईला भेटण्यासाठी जात असताना ही घटना शनिवार (ता.३१ मे) रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.