
तुमच्या घरातील एखाद्याला तरी घालवितोच तसा दम दिला. नंतर गाडीमध्ये गिअर बॉक्सजवळ ठेवलेले दोन लाख रुपये रोख व गाडीचे कागदपत्र चोरून नेले.
पारनेर ः एकास दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून चार चाकी गाडीची काच फोडून त्या गाडीतील दोन लाख रुपये चोरून नेले असल्याची फिर्याद गाडीमालक सतीश कारखेले ( रा. राळेगण थेरपाळ) यांनी दिली आहे.
ही घटना राळेगण थेपाळ येथे एक नोव्हेंबर रोजी घडली आहे. या बाबत पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत माहिती अशी की, काल (ता. 1 ) सतिष कारखेले यांच्या मालकीची कार ( क्र.एम. एच. 16 बी. एच.9761) ही राळेगण थेरपाळ गावात बस स्थानकाजवळ उभी केली.
प्रशांत उर्फ अण्णा किसन कारखिले (रा. राळेगण थेरपाळ ता. पारनेर) यास 31 ऑक्टोंबर रोजी त्याने दारू पिण्यास पैसे मागितले असता दिले नसल्याचा राग मनात धरुन सतीश कारखेले यांच्या कारचे दरवाजाचे नुकसान करून मागील काच फोडली. तसेच शिवीगाळ केली व काय करावयाचे ते करून घे.
तुमच्या घरातील एखाद्याला तरी घालवितोच तसा दम दिला. नंतर गाडीमध्ये गिअर बॉक्सजवळ ठेवलेले दोन लाख रुपये रोख व गाडीचे कागदपत्र चोरून नेले असल्याची फिर्याद सतीश कारखिले यांनी पारनेर पोलीस ठाण्यात प्रशांत कारखिले याच्या विरोधात दिली आहे.
पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे करत आहेत.
संपादन - अशोक निंबाळकर