
पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत मुलगा सीतारामसह दोघांना ताब्यात घेतले. अखेर त्याने गुन्हा कबूल केला.
बोटा : किरकोळ कौटुंबिक कलहातून मुलानेच जन्मदात्या बापाला ठार मारल्याची घटना खंदरमाळवाडी (ता. संगमनेर) हद्दीत बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास घडली.
भीमा सोमा काळे (वय 50, रा. आंभोरे ता. संगमनेर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सिताराम भिमा काळे (वय 35 रा. आंभोरे, ता. संगमनेर) याला अटक केली आहे. घारगाव पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार भिमा सोमा काळे हे आंभोरे येथील रहिवासी होते.
हेही वाचा - आरक्षणाची गंमत ः राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची झाली गोची
दरम्यान, मंगळवारी रात्री घरातील किरकोळ वादाचे रुपांतर बाप-लेकाच्या भांडणात झाले. रात्री उशिरापर्यंत दोघेही घराबाहेर होते. दरम्यान, भीमा काळे यांचा मृतदेह खंदरमाळवाडीच्या हद्दीत पहाटेच्या सुमारास वाटसरुंना दिसला. त्यांनी पोलिस पाटील पुंडलीक साळुंखे व घारगाव पोलीस ठाण्याचे निरिक्षक सुनिल पाटील यांना माहिती दिली.
पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत मुलगा सितारामसह दोघांना ताब्यात घेतले. अखेर मद्यपी सितारामने गुन्हा कबूल केला. त्याच्यासोबत असलेल्या साथीदाराची चौकशी दुपारी उशिरापर्यंत सुरू होती. मृत काळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
राजू खेडकर, सुरेश टकले, संतोष खैरे, किशोर लाड, हरिश्चंद्र बांडे, प्रमोद चव्हाण, गणेश तळपाडे, पोलीस पाटील बाळासाहेब कदम, कुंडलिक साळुंके यांनी याप्रकरणी तपास केला.