

Low customer turnout is visible in Sonai’s markets ahead of Diwali amid rural financial distress
esakal
सोनई, : अवघ्या दोन दिवसांवर दिवाळी सण आला असताना येथील महावीर पेठ, नवीपेठ व शिवाजी रस्त्यावर खरेदीसाठी गर्दीचा शुकशुकाट पाहण्यास मिळाला.पावसाची अवकृपा आणि संभाव्य दुष्काळजन्य स्थिती लक्षात घेऊन आणि नगदी पिकांची फरपट झाली असल्याने कमी खर्चात सण साजरा करण्याचा बाका प्रसंग आला असल्याचे चित्र आहे.