Ashadhi Wari: आषाढी वारीच्या रथासाठी जेऊर हैबतीच्या ‘सोन्या लक्षा’ला मान; 'म्हस्के कुटुंबीयांचा आनंद झाला व्दिगुणित'

आषाढी सोहळ्यात तीन बैलजोड्या क्रमाने सेवा देतात. या तीन बैल जोड्यांची निवड संस्थानची निवड समिती करते. यासाठी २० ते २२ बैल जोड्यांच्या मालकांनी अर्ज केले होते. त्यात तीन बैलजोड्यांची निवड होऊन जेऊर हैबती येथील माजी सरपंच संतोष म्हस्के व कृष्णा म्हस्के यांच्या सोन्या-लक्षा ही बैलजोडी देखणी ठरली.
Jeur Haibati’s ‘Sonya Laksha’ selected to lead the Ashadhi Wari chariot as Mhaske family beams with pride.
Jeur Haibati’s ‘Sonya Laksha’ selected to lead the Ashadhi Wari chariot as Mhaske family beams with pride.Sakal
Updated on

-रवींद्र सरोदे

कुकाणे : श्री क्षेत्र त्रिंबकेश्वर ते पंढरपूर या संत निवृत्तीनाथांच्या पायी आषाढी वारी पालखी रथासाठीच्या मानाच्या बैल जोडीचा पहिला मान मिळाला आहे. जेऊर हैबती (ता. नेवासे) येथील माजी सरपंच संतोष म्हस्के व कृष्णा म्हस्के यांच्या देखण्या सोन्या-लक्षाच्या खिलारी बैलजोडीला मिळाला आहे. राज्यात प्रसिद्ध व मोठी असणाऱ्या दिंडीच्या पालखी रथ ओढण्याचा मान मिळाल्याने म्हस्के कुटुंबीयांचा आनंद व्दिगुणित झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com