
-मनोज जोशी
कोपरगाव : येत्या काळात सोयाबीनला बाजारात मोठा भाव मिळण्याच्या आशेने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवली. दुसरीकडे नाफेड शासकीय हमीभाव केंद्राची मुदत संपल्याने ते बंद झाले. बाजारात शासन हमीपेक्षा तब्बल एक हजार रुपयांनी भाव कमी मिळत असल्याने अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. हमीभावाच्या संधीचा फायदा न घेतलेल्या अनेक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.