
कोपरगाव : महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने आयोजित केलेल्या स्पंदन या युवा महोत्सवाचे एसजेएस फाउंडेशनतर्फे उत्तम नियोजन करण्यात आले. विविध वैद्यकीय शाखांतील विद्यार्थ्यांना आपल्या कला गुणांचे सादरीकरण करण्याची संधी या युवा महोत्सवाच्या निमित्ताने मिळते. वैद्यकीय क्षेत्रातील आयुर्वेद, अॅलोपॅथी, होमिओपॅथीसह सर्व उपचार पध्दतींनी हातात हात घालून काम करावे. त्यातून आजारांवर जलदगतीने मात करणे शक्य होईल, असे मत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी व्यक्त केले.