भारतीयांचे जीवन चांगले बनवण्यासाठी दीनदयाळ यांचे मोठे योगदान

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

२१ व्या शतकात भारताला जागतिक स्तरावर एक नवी उंची देण्यासाठी १३० कोटीहून अधिक भारतीयांचे जीवन चांगले बनवण्यासाठी आज जे काही होत आहे, त्यात दीनदयाळ यांचे मोठे योगदान आहे. आपल्या देशातील शेतकरी, श्रमिक वर्ग, तरूण, मध्यम वर्गाच्या हितासाठी अनेक चांगले आणि ऐतिहासिक निर्णय घेतले गेले, असे आमदार वैभवराव पिचड यांनी राजूर येथे बोलताना म्हणाले. 

अकोले (नगर) : देशात ज्या ज्या वेळी सामाजिक व आर्थिक चिंतनाचा विषय येत होता. त्यावेळी महात्मा गांधी, जे.पी. लोहिया आणि दीनदयाळ यांचे नाव अग्रेसर असायचे. गांधीजींनी आझादीची दुसरी लढाई अहिंसाच्या मार्गाने तर जे.पी लोहिया यांनी समाजवादी विचारसरणी अंगिकारली. तर दीनदयाळ उपाध्याय यांनी स्वदेशीचा अंगीकार करून सामाजिक व आर्थिक अभ्यासाचे सर्वश्रेष्ठ अभ्यासक बनले. तर शेवटच्या माणसापर्यंत, शेतकऱ्यांकडे लक्ष्य देऊन स्वदेशी चळवळ राबवली.

२१ व्या शतकात भारताला जागतिक स्तरावर एक नवी उंची देण्यासाठी १३० कोटीहून अधिक भारतीयांचे जीवन चांगले बनवण्यासाठी आज जे काही होत आहे, त्यात दीनदयाळ यांचे मोठे योगदान आहे. आपल्या देशातील शेतकरी, श्रमिक वर्ग, तरूण, मध्यम वर्गाच्या हितासाठी अनेक चांगले आणि ऐतिहासिक निर्णय घेतले गेले, असे आमदार वैभवराव पिचड यांनी राजूर येथे बोलताना म्हणाले. 

दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून तसेच कार्यक्रमापूर्वी वृक्षारोपण करून उपस्थितांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी मंगलदास भवारी, तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे, यशवंत आभाळ, वकील वसंत मनकर यांनी मनोगत व्यक्त केले.  
 
राजूर येथे तसेच तालुक्यात भारतीय जनता पार्टी, कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, सभापती उर्मिला राऊत, उपसभापती दत्ता देशमुख, विश्वस्त तथासेक्रेटरी प्रा.एम.एम.भवारी, संस्थेचे अध्यक्ष भरतराव घाणे, माधवराव गभाले, गुरुजी विठ्ठलराव भवारी, सी.बी.भांगरे, भरतराव घोरपडे, पांडुरंग खाडे, सुनिल सारोक्ते उपस्थित होते. 

अकोले एज्युकेशन संस्थेचे सचिव यशवंत आभाळे तसेच आदी मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन केले. शनी गल्लीमध्ये ग्राहक पंचायतच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अँड वसंतराव मनकर, मच्छिंद्र मंडलिक, शिवसेना नगरसेवक प्रमोद मंडलिक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामहरी तिकांडे आदींनी पूजन केले. नगराध्यक्षा संगीता शेटे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, नगरसेविका सोनाली नाईकवाडी, धनंजय संत, नितीन जोशी, हितेश कुंभार, बबलू धुमाळ, मच्छिंद्र चौधरी, अनिल कोळपकर, दत्ता ताजने, यांनी आपले प्रभागात प्रतिमा पूजन केले. धुमालवाडी मध्ये जेष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ, सरपंच डॉ. रवींद्र गोरडे, विरगाव जालिंदर वाकचौरे, कळस बु येथे भाऊसाहेब वाकचौरे, नामदेव निसळ, सुलतानपूर सुभाष कानवडे, कळस खुर्द ला सुरेश पथवे, राजू सावंत, सुगाव येथे लता देशमुख, संदीप देशमुख परखतपुर सुशांत वाकचौरे, ढोकरी ज्ञानेश पुंडे, ब्राम्हणवाडा शारदा गायकर, डोंगरगाव सुनील उगले, रवी घुले आदींनी भाजप राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रास्तविक सीताराम भांगरे यांनी केले तर आभार उपसभापती दत्तात्रय देशमुख यांनी मानले. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Speaking at Rajur MLA Vaibhavrao Pichad said that Deendayal has a great contribution to make the lives of Indians better