
अहिल्यानगर : भरधाव वेगातील मालट्रकने दुचाकीस्वाराला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शेंडी बायपास रोडवरील द्वारकादास श्यामकुमार मॉलसमोर २२ जुलै रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. शैलेश मल्हारी झिंजुर्टे (वय ३८, रा. सोलापूर, हल्ली रा. चेतना कॉलनी, नवनागापूर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.