
श्रीरामपूर : श्रीराम तरूण मंडळाचे अध्यक्ष तथा व्यापारी अशोक उपाध्ये त्यांच्यावर मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास चार तरुणांनी हल्ला केला. याप्रकरणी आमदार हेमंत ओगले यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा निषेध नोंदविला. त्यानंतर नेतेमंडळींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत घटनेच्या निषेधार्थ शहरातील व्यापाऱ्यांनी दैनंदिन व्यवहार बंद ठेवले होते.