
श्रीरामपूर : निपाणी वडगाव येथील गुन्ह्यातील आरोपींचा बुधवारी (ता.२२) न्यायालयाने जमीन मंजूर केला. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीचे आदेश असतांनाही आरोपीचे नातेवाईक व मित्र असे ५० ते ६० जणांनी गोंधळ घालून या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.