
टाकळी ढोकेश्वर : कान्हूर पठार (ता. पारनेर) येथील एस. टी.वाहकाच्या कुटुंबातील रोहित सुभाष शिंदे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळवित पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. या यशाबद्दल गावाने कौतुक करत त्याची मिरवणूक काढत सन्मान केला.