एसटी धावते मोकळीच, प्रवासी नसल्याने मोकार हेलपाटे

ST did not get income even after turning the wheel
ST did not get income even after turning the wheel

नगर ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाउन जाहीर केल्यामुळे 22 मार्च ते 21 मेदरम्यान बससेवा बंद होती. त्यानंतर सरकारने नियम शिथिल केल्यावर 22 मेपासून एसटीचे चाक धावू लागले. मात्र, प्रवासी मिळत नसल्याने तोट्यातच बसच्या फेऱ्या करण्याची वेळ एसटी प्रशासनावर आली आहे. 

कोरोना संकटामुळे एसटी सेवा बंद ठेवण्यात आली. लॉकडाउनचे नियम शिथिल झाल्यानंतर एसटी महामंडळाला जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतुकीस राज्य सरकारने परवानगी दिली. जिल्ह्यात 22 मेपासून एसटी सेवा सुरू झाली. मात्र, प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे अवघ्या चार-पाच प्रवाशांसह एसटीला धावावे लागत आहे. प्रवासीच मिळत नसल्याने अनेकदा फेऱ्या रद्द करण्याची वेळ एसटी प्रशासनावर येत आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी (ता. पाच) 25 बसच्या 94 फेऱ्या झाल्या. त्यांत फक्त 1010 प्रवासी मिळाले. शनिवारी (ता. सहा) 19 बसच्या 84 फेऱ्या झाल्या. त्यांत फक्त 985 प्रवाशांनी प्रवास केला. प्रवाशांची संख्या कमी असल्यामुळे एसटीचा डिझेलचा खर्चही निघणे मुश्‍कील झाले आहे. 


दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावात एसटीकडून विशेष काळजी घेतली जात आहे. प्रत्येक बस सॅनिटाइझ करूनच आगारातून मार्गस्थ होत असल्याचे विभागीय कार्यालयातील वाहतूक अधीक्षक दादासाहेब महाजन यांनी सांगितले. 

36 हजार व्यक्तींची एसटीद्वारे घरवापसी! 
एसटी महामंडळाच्या नगर व ठाणे विभागीय कार्यालयांतर्गत असलेल्या आगारातील 1567 बसद्वारे 35 हजार 667 जणांना घरी सोडण्यात आले. कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर केले. त्यात अनेकांचा रोजगार गेला.

काही जण कोरोनाच्या भीतीने घरी परतण्याच्या तयारीत होते. मात्र, वाहने मिळत नसल्याने ते अडकून पडले. या सर्वांना एसटी महामंडळाने बसद्वारे घरी सोडले. त्यात ठाणे व नगर विभागातील 1567 बसमधून एकूण 35 हजार 667 जणांना राज्यासह परराज्यांत त्यांच्या घरी, तर काहींना रेल्वेस्थानकापर्यंत नेऊन सोडल्याचे विभागनियंत्रक विजय गिते यांनी सांगितले.

प्रवाशांना सोडताना एकाही एसटी कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली नाही. एसटीकडून विशेष खबरदारी घेण्यात येत असल्याने व बस सॅनिटाइझ केल्या जात असल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com