esakal | चेक नाक्यावर बसस्थानक ठरले पोलिसांचा आधार 
sakal

बोलून बातमी शोधा

ST stand became police base in lockdown on Nagar Kalyan Maharga

नगर- कल्याण महामार्गावर लॉकडाऊनमध्ये जिल्याबाहेरील लोकांच्या ईपास तपासणी करीता मुख्य चेक नाका असणाऱ्या काळेवाडी (ता. पारनेर) येथे पोलिस, शिक्षकासह इतर अधिकारी वर्गाला ऊन, वारा, पाऊसापासुन सुरक्षित राहण्यासाठी बस स्थानक पोलिसांचा आधार बनले आहे.

चेक नाक्यावर बसस्थानक ठरले पोलिसांचा आधार 

sakal_logo
By
सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : नगर- कल्याण महामार्गावर लॉकडाऊनमध्ये जिल्याबाहेरील लोकांच्या ईपास तपासणी करीता मुख्य चेक नाका असणाऱ्या काळेवाडी (ता. पारनेर) येथे पोलिस, शिक्षकासह इतर अधिकारी वर्गाला ऊन, वारा, पाऊसापासुन सुरक्षित राहण्यासाठी बस स्थानक पोलिसांचा आधार बनले आहे.

याबाबत माहीती अशी की, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पारनेर तालुक्यात विविध ठिकाणी जिल्ह्यातुन बाहेर जाण्यासाठी व इतर जिल्ह्यातुन पारनेर तालुक्यात येण्यासाठी पोलिस यंत्रणेने विविध ठिकाणी ईपास तपासणी नाके उभारले होते. त्यापैकी महत्त्वाचा असणारा नगर कल्याण महामार्गावर असणारा काळेवाडी तपासणी नाका या ठिकाणी पोलिस यंत्रणेसह शिक्षक, महसुल विभागातील अधिकाऱ्यांची तपासणीसाठी नेमणुक करण्यात आली होती.

रस्त्यावर ही सर्व यंत्रणा सुरू झाल्यावर पाऊस व इतर कागदपत्रे ठेवण्यासाठी काय व्यवस्था करायची याची अडचण निर्माण झाली होती. मात्र या सर्वांवर महामार्ग नव्याने झाल्यानंतर चांगल्या दर्जाचे बस स्थानक बांधण्यात आले होते. यावरच प्लास्टिकचा कागद सर्व बाजुने लावुन याचेच छोटेसे घर करण्यात आले.

हेच तपासणीमधील सर्व यंत्रणेचे निवासस्थान देखील बनले. आता काही दिवसांनी ईपास रद्द देखील करण्यात येईल. मात्र बसस्थानकामुळे ऊन, वारा, पावसाचा आम्हाला चांगला निवारा मिळाला असल्याचे या यंत्रणेतील अधिकारी सांगतात.

तपासणी नाका कायम करण्यासाठी प्रयत्न : राजेश गवळी
लॉकडाऊनमध्ये या तपासणी नाक्यावर बस स्थानकाचा चांगला उपयोग होत आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी तपासणी नाक्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांना जागा देण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. पारनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर