esakal | कोरोनामुळे गाळात रूतलेली एसटी पुन्हा सुटली सुसाट
sakal

बोलून बातमी शोधा

ST started running fast again

लॉकडाउन काळात सर्वच व्यवहार ठप्प झाले. त्यात एसटी सेवाही पूर्णपणे बंद करण्यात आली. 22 मार्चपासून बंद झालेल्या एसटीला 22 मेपासून जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतुकीस राज्य सरकारने परवानगी दिली. त्यानंतर 20 ऑगस्टला आंतरजिल्हा व आठ ऑक्‍टोबरला आंतरराज्य एसटीला प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली.

कोरोनामुळे गाळात रूतलेली एसटी पुन्हा सुटली सुसाट

sakal_logo
By
दौलत झावरे

नगर ः कोरोनामुळे एसटीचे चाक 22 मार्चपासून रुतले होते. त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर झाला. आता राज्य सरकारने प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली. त्यामुळे राज्यभर आता एसटीची सेवा सुरू झाली असून, अहमदनगर विभागाच्या जिल्हातंर्गत, आंतरजिल्हा व आंतरराज्य बस धावत असून, त्यास प्रवाशांचाही प्रतिसाद मिळत आहे. अनलॉक सुरू झाल्यापासून रुतलेल्या चाकाला गती मिळाली आहे. 

लॉकडाउन काळात सर्वच व्यवहार ठप्प झाले. त्यात एसटी सेवाही पूर्णपणे बंद करण्यात आली. 22 मार्चपासून बंद झालेल्या एसटीला 22 मेपासून जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतुकीस राज्य सरकारने परवानगी दिली. त्यानंतर 20 ऑगस्टला आंतरजिल्हा व आठ ऑक्‍टोबरला आंतरराज्य एसटीला प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली.

सुरवातीच्या काळात एसटीला प्रवाशांकडून कमी प्रतिसाद मिळत होता. मात्र, आता एसटीला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळू लागल्याने, एसटी मंडळाकडून बसच्या फेऱ्या वाढविण्यात येत आहेत. आगामी काळात दिवाळीमुळे एसटीला प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन, आता एसटीकडून जादा बस सोडण्याचे नियोजन केले जात आहे. 

सध्या अहमदनगर विभागातून एसटीच्या जिल्ह्यांतर्गत 48 बसच्या माध्यमातून 221, आंतरजिल्हा 163 बसच्या माध्यमातून 390 व आंतरराज्य चार बसच्या माध्यमातून चार फेऱ्या होत आहेत. 

राज्यांतर्गत पुणे-नागपूर बससेवा सर्वात जास्त किलोमीटरची असून, तिला सुरवात झाली आहे. पुणे-नागपूर शिवशाही शययान वातानुकुलीत बस सुरू झाली आहे. त्याला नगरमधील प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

अशी सुरू आहे बससेवा 
जिल्ह्यांतर्गत ः आगारातून जिल्ह्याच्या व तालुक्‍यांच्या, तसेच तालुक्‍यातील मोठ्या गावांमध्ये. 
आंतरजिल्हा ः इतर जिल्ह्याच्या ठिकाणी व इतर जिल्ह्यांतील मोठे तालुके. त्यात मुंबई, पुणे, धुळे, नाशिक, जळगाव, बीड, जालना, कल्याण, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आदी. 
आंतरराज्य ः श्रीरामपूर- सुरत. 

ग्रामीण भागात मिनी बस सुरू करा 
कोरोनामुळे अनेक जण प्रवास टाळत आहेत; परंतु अनेकांची स्वतःची वाहने नसल्याने व कामानिमित्त तालुक्‍याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे गरजेचे आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने मिनी बससेवा ग्रामीण भागातील जनतेसाठी सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. 

loading image