पालखी सोहळा सुरू करा; शिर्डीतील नागरिकांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालखी सोहळा सुरू करा; शिर्डीतील नागरिकांची मागणी

पालखी सोहळा सुरू करा; शिर्डीतील नागरिकांची मागणी

शिर्डी : कोविड प्रकोप कमी झाल्याने दर गुरुवारी आयोजित केला जाणारा साईबाबांचा पालखी सोहळा व उत्सवकाळातील रथयात्रा पूर्ववत सुरू करावी, तसेच द्वारकामाई मंदिरात आतल्या बाजूने दर्शनव्यवस्था सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने ken (मंगळवारी) साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत यांची भेट घेऊन केली.

या शिष्टमंडळात माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके, शिवसेनेचे नेते कमलाकर कोते, साईसंस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, नितीन कोते, प्रमोद गोंदकर, ताराचंद कोते, गफ्फार पठाण, माजीद पठाण, दत्तात्रय कोते आदींचा समावेश होता.

यावेळी या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की साईमंदिर परिसरात ठिकठिकाणी लावलेल्या लोखंडी जाळ्या हटवून अडथळे दूर करावेत. साईसमाधीच्या बाजूला लावण्यात आलेली काच तेथून हटवावी. भाविकांना साईसमाधीला स्पर्श करून दर्शन घेऊ द्यावे. साईमंदिरातील शांतता कायम राहील, तसेच कर्मचारी भाविकांसोबत सौजन्याने वागतील, याची काळजी घ्यावी. मंदिरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्यात. दर रविवारी व गुरुवारी गुरुपाठ पठणाची परंपरा आहे, मात्र कोविड प्रकोपात त्यात खंड पडल्याने ही परंपरा पुन्हा सुरू करावी.

दर गुरुवारी साईंचा पालखी सोहळा आयोजित केला जातो. साईबाबा हयात होते तेव्हापासूनची ही पंरपरा आहे. उत्सवातील रथयात्रा हीदेखील जुनी परंपरा आहे. हे दोन्ही धार्मिक सोहळे पुन्हा सुरू व्हावेत, यासाठी साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत यांना भेटलो. त्यांनी मागण्यांचा सहानुभूतिपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले.

- कमलाकर कोते, शिवसेना नेते

Web Title: Start Palkhi Ceremony Demand Of Citizens Of Shirdi Ahmednagar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ahmednagarshirdi
go to top