अहमदनगर : राज्य उत्पादन शुल्क विभाग : नऊशे कोटी वसूल

वर्षात ९६२ कारवाया; ८३० आरोपींवर कारवाई
State Excise Department
State Excise Departmentsakal

अहमदनगर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी २०२०-२१ या वर्षात बेकायदा व बनावट दारू तयार करणाऱ्यांवर छापे घातले. वर्षभरात ९६२ गुन्हे दाखल करून ८३० आरोपींवर कारवाई केली, तसेच वर्षभरात ८९९.४७ कोटी रुपयांचा महसूल वसूल केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहमदनगर जिल्हा कार्यालयात एक अधीक्षक, पाच निरीक्षक आहेत. या निरीक्षकांसह तीन ते चार कर्मचाऱ्यांचा समावेश असणारी दोन भरारी पथके आहेत. २०१९-२० मध्ये एक हजार ५९७ गुन्हे दाखल केले. वारस गुन्हे एक हजार ३३९, बेवारस गुन्हे २५८, अटक आरोपी एक हजार ३१०, जप्त वाहने २०६, एकूण जप्त मुद्देमाल पाच कोटी ४५ लाख रुपये आहे. २०२०-२१ मध्ये एक हजार ६६७, वारस गुन्हे एक हजार ३४१, बेवारस गुन्हे ३२६, अटक आरोपी एक हजार २१४, जप्त वाहने १७६, एकूण तीन कोटी सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

State Excise Department
Rain Update: राज्यात अवकाळीचा तडाखा कुठे? काय झालाय परिणाम?

मागील दोन्ही वर्षांच्या तुलनेत २०२१-२२ या कोरोनाच्या काळात ऑक्‍टोबर २०२१ पर्यंत एकूण ९६२ कारवाया केल्या. यात वारस गुन्हे ८८६, बेवारस गुन्हे ७६, अटक आरोपी ८३०, जप्त वाहने ७०, एकूण तीन कोटी ३७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत २०२१-२२ ऑक्‍टोबरपर्यंत ९६२ इतक्‍या कमी केसेस करून ८३० आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत ८९९.४७ कोटी रुपयांचा कमी महसूल हा अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाला आहे.

साखर कारखान्यांमुळे उत्पन्न अधिक

अहमदनगर जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांचे अल्कोहोल निर्मिती प्रकल्प आहेत. त्यामुळे उत्पादनशुल्क मोठ्या प्रमाणात जमा होते. त्यामुळे जिल्ह्यात उत्पादन वाढते. उत्पादन शुल्क विभागाकडून कायम बेकायदा दारूविक्रीवर कारवाया केल्या जातात. त्याच्या दंडापोटीही उत्पन्नात वाढ होते.

State Excise Department
जळगाव : हिरापूरजवळ भीषण अपघात; तीन जण जागीच ठार

असे आहे उत्पन्न

२०१९-२० १४५८.७४ कोटी

२०२० - २१ १४७९.०१ कोटी

२०२०ऑक्टोबर अखेर ८९९.४७ कोटी

"बेकायदा दारूविक्री आढळल्यास किंवा तसे कळल्यास उत्पादन शुल्क विभागाकडून तातडीने कारवाई केली जाते. तसेच विविध कारवायांच्या माध्यमातून जिल्ह्यात कर व दंड स्वरूपात मोठी वसुली होऊ शकली. केंद्रशासित प्रदेशातून तसेच गोवा राज्यातून दारू स्वस्तात खरेदी करून अन्यत्र घेऊन जाण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा कारवाईतूनही मोठी वसुली होत आहे."

- गणेश पाटील, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com